
खामगाव :- तालुक्यातील राहुड ग्रामसेवा सहकारी संस्था सोसायटीची अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी ३० सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली. दोनच अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक अविरोध पार पडली सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी पोलीस पाटील विलास देविदास बनसोड, यांची तर उपाध्यक्षपदी गुलाबराव देशमुख यांची निवड करण्यात आली.यावेळी आमदार आकाश फुंडकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांना हार घालून शुभेच्छा दिल्या सदर निवडणूक खामगाव येथील प्रशासकीय इमारत मध्ये सहकार ऑफिस मध्ये पार पडली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जि आर दहिभात यांनी काम पाहिले व गटसचिव आर आर उन्हाळे यांनी सहकार्य केले. यावेळी माजी अध्यक्ष देविदास बनसोडे,माजी संरपच बळीराम मते माजी उपसंरपच अनंतराव इंगळे,लक्ष्मण देशमुख, बळीराम देवळे,रामदास घनोकार प्रकाश भाकरे,ज्ञानदेव मते,पुंडलिक चीम वसंतराव इंगळे,गजानन वसतराव इंगळे
गजानन इंगळे,रायभान इंगळे, लिलाबाई वर्गे,अन्नपूर्णा देवळे, उपस्थित होते.